चांद्रयान-3 ने पाठवला पृथ्वीचा मनमोहक फोटो

हिंदुस्थानने 14 जुलै रोजी पाठवलेले ‘चांद्रयान-3’ आता चंद्राच्या खूपच जवळ गेले आहे. अगदी जवळून चंद्राचा फोटो पाठवल्यानंतर ‘चांद्रयान-3’ने आता पृथ्वीचा मनमोहक आणि अविश्वसनीय फोटो पाठवला आहे. ‘चांद्रयान-3’ आता चंद्रापासून फक्त 1400 कि.मी. अंतर दूर आहे. चंद्राच्या मिशनवर असलेले ‘चांद्रयान-3’ एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. ‘चांद्रयान-3’ने चंद्राचा जो ताजा फोटो पाठवला आहे. त्यात चंद्रावरील खड्डे स्पष्ट दिसत आहेत. हा फोटो 5 ऑगस्टला अंतराळात यानाच्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर क्लिक करण्यात आला आहे. या फोटोला अंतराळ यानावर लँडर हॉरिजॉन्टल वेलोसिटी कॅमेराद्वारा (एलएचव्हीसी) कॅप्चर करण्यात आले आहे.