प्रेमविवाहाला विरोध; प्रियकराच्या साथीने पोटच्या मुलीनेच दिली वडिलांची सुपारी

मुलीसह पाचजणांना अटक

प्रेमविवाहाला विरोध करणाऱया वडिलांचे पाय तोडले, तर त्यांचा अडथळा होणार नाही. यासाठी प्रियकराच्या साथीने पोटच्या मुलीनेच वडिलांची सुपारी दिली. ठरल्याप्रमाणे मंगळवारी रात्री शेटफळ-माढा रस्त्यावर पाचजणांनी वडिलांना जबर मारहाण केली. यामध्ये माढय़ातील प्रसिद्ध व्यापारी महेंद्र शहा गंभीर जखमी झाले आहेत. मारहाणीनंतर मुलीने रचलेल्या बनावाचा माढा पोलिसांनी काही तासांत पर्दाफाश करीत मुलगी, प्रियकर आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. मुलीनेच वडिलांची सुपारी दिल्याच्या घटनेने सोलापूर जिह्यात खळबळ उडाली आहे.

मुलगी साक्षी शहा, चैतन्य कांबळे, अतिक लंकेश्वर, मयूर चंदनशिवे, राम पवार आणि आनंद ऊर्फ बंडय़ा जाधव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मारहाणीत गंभीर जखमी झालेले व्यापारी महेंद्र शहा यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

साक्षी शहा हिचे चैतन्य कांबळेसोबत प्रेमसंबंध होते. दुकानाचे साहित्य आणण्यासाठी साक्षी सोमवारी पुण्याला गेली होती. रात्री सक्कादहाच्या सुमारास बसने शेटफळ (ता. माढा) येथे आली. तिला आणण्यासाठी वडील महेंद्र शहा कार घेऊन गेले होते. शेटफळहून परत येताना रस्त्यात कडाची काडीजकळ लघुशंकेचे निमित्त करून साक्षी हिने गाडी थांबकिण्यास सांगितले. त्यावेळी मागून दोन दुचाकीकर आलेल्या चौघांनी महेंद्र शहा यांच्यावर हल्ला केला. लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. एकाने डोक्यात खोऱयाचा दांडा मारल्याने महेंद्र शहा हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर मारेकरी पसार झाले. कडाची काडीचे उपसरपंच बापू काळे क रामचरण डोंगरे यांनी जखमी क्यापारी महेंद्र शहा यांना उपचारासाठी हलकले. याप्रकरणी साक्षी हिने दिलेल्या तक्रारीवरून माढा पोलिसांनी मंगळकारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून पाचजणांना अटक केली.