विमानाला उशीर झाला, संतप्त प्रवाशाने वैमानिकालाच केली मारहाण

indigo

दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानात कडाक्याची थंडी पडली आहे. धुक्यांमुळे विमाने उशीरा जडात आहेत. अशा परिस्थित इंडिगोटच्या एका फ्लाईटमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. विमानाला उशीर झाल्याने संतापलेल्या प्रवाशाने वैमानिकाच्या कानशिलात लगावली, ज्यानंतर विमानात एकच गोंधळ उडाला. ही घटना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे विमानाला उशीर झाल्याने त्रस्त प्रवाशाने वैमानिकाला बुक्का मारला. धुक्यामुळे विमानाला उशीर झाला होता, मात्र प्रवाशांना नीट माहिती दिली जात नव्हती. ही घटना रविवारी सायंकाळी 7 ची आहे. याप्रकरणी आयजीआय पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. आयजीआय पोलिसांनी तक्रार दाखल करत सदर प्रवाशाला ताब्यात घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, फ्लाइटमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने वैमानिकाला उड्डाणाच्या विलंबाबाबत घोषणा करत असताना मारहाण केली. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पिवळा हुडी घातलेला एक प्रवासी अचानक शेवटच्या रांगेतून धावत आला आणि त्याने वैमानिकाला धक्काबुक्की केली. व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, इंडिगोचे विमान 13 तास उशिराने आले होते. व्हिडिओला प्रतिसाद देताना, एक्सवर एका वापरकर्त्याने लिहिले, ‘वैमानिक किंवा केबिन क्रूचा विलंबाशी काय संबंध? ते फक्त त्यांचे काम करत होते. या माणसाला अटक करा आणि त्याला नो-फ्लाय लिस्टमध्ये टाका. त्याचा फोटो व्हायरल करा जेणेकरून लोकांना त्याच्या वाईट स्वभावाची सार्वजनिकरित्या जाणीव होईल.

फ्लाइट ट्रॅकर वेबसाइट फ्लाईट ट्रेडर24 नुसार, दिल्ली विमानतळावर अनेक उड्डाणे उशीर होत असताना ही घटना घडली. आज 110 उड्डाणे उशीर झाली असून 79 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सरासरी विलंब 50 मिनिटांपर्यंत पोहोचला. विमानांची उशीर होत असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते.