उत्तरेत पावसाचे 145 हून अधिक बळी; हिमाचल, उत्तराखंडमध्ये यलो अलर्ट

हिंदुस्थानच्या उत्तरेकडील राज्यामध्ये काही भागांमध्ये मान्सून सुरू झाल्यापासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये 145 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्ये पूर आणि भूस्खलन सुरू असून, अनेक पर्यटक अडकून पडले आहेत.

पावसाळा सुरू झाल्यापासून 91 मृत्यूंसह हिमाचल प्रदेश सर्वाधिक प्रभावित झालेले राज्या आहे. उत्तर प्रदेशमध्ये 14, हरियाणामध्ये 16, पंजाबमध्ये 11 आणि उत्तराखंडमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दोन्ही राज्यांमध्ये पाऊस, गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याचा यलो इशारा आहे. डोंगरात दरड कोसळल्याने राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते बंद झाले आहेत. यमुनेच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाल्यामुळे दिल्लीत अनेक ठिकाणी पूर आणि पाणी साचले. तसेच, ताज्या अहवालांनुसार, शुक्रवारी एका रात्रीत पाण्याची पातळी 17 सेंटीमीटरने खाली आली आहे आणि आता ती 208.46 मीटर इतकी आहे.

राजघाट आणि पुराण किला भागात गंभीर पाणी साचल्याची नोंद आहे आणि लाल किल्ला 14 जुलैपर्यंत पर्यटकांसाठी बंद आहे.