‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा मित्रावर बलात्काराचा आरोप, तक्रार दाखल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलीट शो ‘बिग बॉस’मध्ये 11 व्या हंगामात स्पर्धक राहिलेल्या एका अभिनेत्रीने मित्रावर बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी तिने दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

‘बिग बॉस’च्या 11 व्या हंगामामध्ये स्पर्धक म्हणून राहिलेल्या अभिनेत्रीने मित्रावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्याने मला घरी बोलावून दारू पाजली आणि त्यानंतर माझ्यावर बलात्कार केला असा आरोप अभिनेत्रीने केला आहे. दक्षिण दिल्लीतील एका पोलीस स्थानकामध्ये अभिनेत्रीने तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरू झाला आहे. अर्थात या अभिनेत्रीचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

‘बिग बॉस’चा 11 वा हंगाम आतापर्यंत सर्वाधिक गाजला होता. या हंगामात अर्शी खान, हिना खानसह अनेक टीव्ही सेलिब्रिटी सहभागी झाला होते. मात्र या सर्वांना मागे सोडत शिल्पा शिंदेने विजेतेपद पटकावले होते. हिना खान हिचा पराभव करत तिने विजेतेपदावर मोहोर उमटवली होती.