मणिपूर चर्चेसाठी सरकार तयार! अमित शहा यांची माहिती

संसदेचं पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षांच्या आक्रमक पवित्र्यानं चांगलंच चर्चेत आहे. तिसरा दिवसही मणिपूरच्या मुद्द्यावर गोंधळाने चर्चेत राहिला. मणिपूरमधील जमावाने दोन महिलांची नग्नावस्थेत धिंड काढल्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून 20 जुलै रोजी सत्र सुरू झाले. या मुद्द्यावरून शुक्रवारी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सविस्तर प्रतिक्रियेची आणि मणिपूरमधील हिंसाचारावर चर्चेची मागणी विरोधकांनी केली.

या दरम्यान, मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. मणिपूर चर्चेसाठी सरकार तयार आहे. मी विरोधकांना विनंती करतो की चर्चा होऊ द्यावी, असं अमित शाह म्हणाले.