पोलीस हवालदाराला हायकोर्टाचा दिलासा; सेवेतून निलंबनाचे आदेश रद्द

सेवेतून निलंबित न करण्याचे विशेष पोलीस अधीक्षकांचे आदेश कायम करत उच्च न्यायालयाने पोलीस हवालदार शिवानंद बोबडे यांना दिलासा दिला आहे. न्या. अतुल चांदुरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने दोन आठवडय़ात बोबडे यांना सेवेत घ्या, असे आदेश न्यायालयाने पोलीस खात्याला दिले.

हवालदार शिवानंद बोबडे यांनी ही याचिका केली होती. बोबडे यांची खातेनिहाय चौकशी झाली. 2 जुलै 2021 रोजी सांगली पोलीस अधीक्षक यांनी बोबडे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. याविरोधात त्यांनी विशेष पोलीस अधीक्षक यांच्याकडे अपील केले. विशेष पोलीस अधीक्षक यांनी बोबडे यांचे निलंबन रद्द केले. बोबडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याचे विशेष पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणण्यात आले. त्याची दखल घेत विशेष पोलीस अधीक्षक यांनी आधीच आदेश रद्द करत बोबडे यांचे निलंबन कायम केले होते.