इर्लामध्ये फसव्या आश्वासनांचा भंडाफोड

विभागप्रमुख अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्र. 70 च्या वतीने इर्ला येथील अंबेमाता चौकात ‘होऊ द्या चर्चा’ मोहिमेत बोलघेवडय़ा पेंद्र आणि राज्य सरकारच्या आश्वासनांचा भंडापह्ड करण्यात आला. विधानसभा संघटिका वीणा टॉक, विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर, उपविभागप्रमुख शरद जाधव, जितेंद्र जानावळे यांनी पेंद्रात मोदी सरकार व राज्यातील मिंधे सरकार जनतेची कशा प्रकारे दिशाभूल करत आहे याचा लेखाजोखा मांडला. यावेळी सिन्नर विधानसभेचे संपर्कप्रमुख प्रसाद नागावकर, विधानसभा चिटणीस हंसराज गुप्ता, युवा शाखा आधिकारी सिद्धेश सुर्वे, उपशाखाप्रमुख मनोज मांजरेकर, प्रकाश पालकर, प्रवीण खानदेशी, गणेश महाडिक, रोहित मोहिते, भानुदास कोळपे, सागर जाधव उपस्थित होते. शाखाप्रमुख संजय जाधव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कांजूर-भांडुप पूर्व विभागामध्ये शिवसेना शाखा क्रमांक 115 च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ’होऊ द्या चर्चा’ला रहिवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्वसामान्यांविरोधात राबवल्या जात असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या फसव्या योजनांविरोधात रहिवाशांनी रोष व्यक्त केला. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य सरकारच्या धोरणांमुळे मेटाकुटीला आले आहेत. सरकारला त्यांचे शिव्याशाप बाधतील, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिला. यावेळी शाखाप्रमुख रवी महाडिक, सुधा पेडणेकर, तानाजी मोरे, भास्कर परब, भारती शिंगटे, मामी मंचेकर, सुवर्णा चव्हाण, सुमन म्हसकर, अरविंद नागनुरी, योगेश पेडणेकर, श्वेता पावसकर, मिलिंद खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक 153च्या वतीने ‘होऊ द्या चर्चा’चे आयोजन खारदेवनगर, सावली नाका येथे करण्यात आले होते. यावेळी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, चेंबूर विधानसभा संघटक संजय नटे, महिला उपविभाग संघटिका सुलभा पात्याने, शाखाप्रमुख उमेश करकेरा, कार्यालय प्रमुख मारुती वाघमारे, माजी महिला शाखा संघटिका वैशाली कदम, माजी महिला शाखा संघटिका अनिता महाडिक, युवासेना चेंबूर विधानसभा समन्वयक गणेश गायकवाड, युवासेना चेंबूर विधानसभा समन्वयक विनय साठले, युवासेना शाखा अधिकारी विनय शेटये, शिवसेना-युवासेना महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग क्रमांक 2 चारकोप मतदारसंघाच्या वतीने ‘होऊ द्या चर्चा’चे आयोजन कांदिवली स्थानक, बजाज शाळेसमोर करण्यात आले. पेंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध व्यक्त करून फसव्या योजनांची पोलखोल करण्यात आली. यावेळी विभागप्रमुख अजित भंडारी, मनाली चौकीदार, विधानसभा संघटक संतोष राणे, अशोक पटेल, विधानसभा संघटक राजन निकम, उपविभागप्रमुख रमाकांत ठाकूर, श्याम मोरे, आनंद नागम, सविता देसाई, आकांक्षा नागम, सीमा लोकरे व शाखाप्रमुख प्रसाद पाटील, सुनील राणे, रवी मरये, अमित कांबळी, निरीक्षक अशोक कासवकर, पूजा मनवाचीर्य यांच्यासह मोठय़ा प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

चिराबाजार, ताडवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ, युवासेना कुलाबा विधानसभा व माऊली प्रतिष्ठान आयोजित मित्तल फाऊंडेशन ट्रस्ट संचालित के. जी. मित्तल आयुर्वेदिक रुग्णालय यांच्या सहयोगाने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी दक्षिण मुंबई माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, माऊली प्रतिष्ठान उपाध्यक्षा पल्लवी सकपाळ, समन्वयक सुनील देसाई, उपविभाग संघटक सरिता तांबट, शाखा संघटक माधुरी पेंढारी, युवासेना सहसचिव प्रथमेश सकपाळ, सोशल मीडिया महाराष्ट्र समन्वयक अमित भाद्रिचा, माजी शाखाप्रमुख दिलीप म्हात्रे, कार्यालय प्रमुख शांताराम सुर्वे, युवासेना उपविभाग अधिकारी मिलिंद झोरे, युवासेना शाखा अधिकारी विपुल पाटील उपस्थित होते.

मुंबईच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख तसेच वर्ल्डवाईड वुमन रायगड जिह्याचे अध्यक्ष कृष्णा कदम यांच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील विविध गावांतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वैद्यकीय मदत कक्ष, वर्ल्डवाईड वुमन व अॅण्टी करप्शन ब्युरो यांच्या माध्यमातून या वेळी दोन हजार वह्या आणि चारशे पंपास बॉक्सचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मयूर देवळेकर, नागेंद्र राठोड, नितीन नारकर, बाजीराव मालुसरे, ज्ञानोबा बांदल यांनी सहकार्य केले.