अल्पवयीन मुलांचे उत्पन्नही कराच्या कक्षेत

जर तुमचा मुलगा, मुलगी अल्पवयीन असेल आणि त्याने युटय़ूब, इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म किंवा छंद, कला यातून कमाई केली असेल किंवा त्याच्या नावावर मालमत्ता असेल तर ते उत्पन्न कराच्या कक्षेत येते. त्यामुळे मुलांच्या उत्पन्नावर इन्कमटॅक्स रिटर्न (आयटीआर) भरावा लागेल. अन्यथा यासाठी पालकांना आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते. दरम्यान, आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत आहे. आयकर कायद्याच्या कमल 64(1) नुसार 18 वर्षांखालील मुलामुलीला मिळालेले कोणतेही उत्पन्न, पैसे, मालमत्ता, गुंतवणूक इत्यादी त्याच्या पालकांच्या आयकर रिर्टनमध्ये एकत्र केले जातात. जर मुलाने दरमहा 1500 रुपये कमावले तर कोणताही कर आकारला जात नाही. मात्र, त्यावरील उत्पन्न मात्र करपात्र आहे.