चांद्रयान-3 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश

चांद्रयान-3 ने तब्बल 22 दिवसांनंतर आज सायंकाळी जवळपास 7.15 वाजेच्या सुमारास चंद्राच्या कक्षेत दिमाखात प्रवेश केला आहे. चांद्रयान-3 हे 14 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून अवकाशात झेपावले होते. हे यान चंद्राच्या गुरुत्वाकर्षणमध्ये कॅप्चर होण्यासाठी यानचा वेग कमी करण्यात आला होता. वेग कमी करण्यासाठी इस्रो वैज्ञानिकांनी यानचे थ्रस्टर काही वेळेसाठी फायर केले. इस्रोने एक्स पोस्टमध्ये याची माहिती दिली. इस्रोने पोस्टमध्ये लिहिले की, ‘MOX, ISTRAC, धिस इज चांद्रयान-3. मी चंद्राचे गुरुत्वाकर्षण अनुभवत आहे. चांद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे. आता 6 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 चे कक्ष कमी केले जाईल. लँडिंगआधी चांद्रयान-3 आता चौथ्यांदा आपली कक्षा बदलेल.