‘कोई मिल गया’ 20 वर्षांनंतर पुन्हा प्रदर्शित, चित्रपटासाठी ‘जादू’ची संकल्पना कशी सुचली; वाचा सविस्तर

अभिनेता ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री प्रिती झिंटा यांनी अभिनय केलेल्या ‘कोई मिल गया’ हा सिनेमा 2003 साली प्रदर्शित झाला होता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटाच्या प्रेक्षकांवर या चित्रपटाने ‘जादू’ केली होती. हा चित्रपट ह्रतिक रोशनच्या चित्रपट कारकिर्दिसाठी महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने चित्रपटाचे निर्माते हा चित्रपट पुन्हा नव्याने प्रदर्शित करण्याची तयारी करत आहेत.

20 व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘कोई मिल गया’ हा सिनेमा 30 शहरांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. 4 ऑगस्टला PVR आणि INOX मध्ये 30 शहरांमधील चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल. चित्रपट हृतिक रोशनचे वडील आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य असे की, हृतिकच्या आईनेही या चित्रपटात भूमिका साकारली होती.

दिग्दर्शक राकेश रोशन यांनी अलीकडेच त्यांच्या चित्रपट कारकिर्दितील 2 दशकांचा अनोखा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या या चित्रपटाबाबत एका मुलाखतीवेळी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा चित्रपट त्यांचा मुलगा ह्रतिक रोशनच्या अभिनय कौशल्यावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. ‘कहो ना प्यार है’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या शानदार यशानंतर हृतिकचे सलग 8 चित्रपट फ्लॉप झाले.

त्यांनी या मुलाखतीत चित्रपटातील ‘जादू’ची संकल्पना कशी सुचली. याबाबत माहिती दिली. त्यांना या सिनेमात दाखवण्यात आलेल्या छोट्याशा आणि गोंडस एलियनबाबत सुरुवातील कोणाच्याही काही लक्षात येत नव्हते. त्यांची ही संकल्पना म्हणजे नेमकं काय आहे, हे कोणाच्याही लक्षात येत नव्हतं. त्यावेळी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत राकेश यांनी त्यांना सुचलेल्या या कल्पनेविषयी सांगितले की, पक्षी, प्राणी किंवा विविध प्रकारच्या संकल्पनांवर आधारित चित्रपट तयार होतात. असे सिनेमे पहायला प्रेक्षकांना आवडतात, तर आपण या संकल्पनांचा वापर आपल्या चित्रपटात का करू नये. त्यामुळे चित्रपटात ‘एलियन’ ची भूमिका साकरण्याचा विचार मनात आला. मला एलियन कसा दिसतो, हेही माहित नव्हते, पण माझ्या मनात त्याच्या विषयी एक प्रतिकृती आकार घेत होती. ती म्हणजे या सिनेमातील एलियन छोटासा, खोल डोळे असलेला असावा. तो प्रत्यक्ष फार काही न बोलता डोळ्यांनीच बोलेल. या कल्पनेबाबत मला असे विचारण्यात आले की, तुम्ही त्याला व्यावसायिकदृष्ट्या कशी प्रसिद्धी द्याल? तेव्हा मला माझ्या या अनोख्या संकल्पनेकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहिले जात आहे, हे मला फारच खटकले होते. त्यामुळे मी तो स्टुडियो सोडून दुसऱ्या स्टुडियोत निघून गेलो.

तेव्हा तेथील स्टुडियो मालकाच्या पत्नीला माझ्या संकल्पनेत रस वाटला. त्यांनी मला विचारले की, ‘तुम्हाला असा एलियन का हवा आहे? आम्ही तर बहुतांश एलियन उंच आणि बारीक शरीरयष्टी असलेले साकारले आहेत.’ यावर राकेश रोशन यांनी तिला सांगितले की, ‘हा एलियन लहान मुलांसोबत खेळणारा असावा. मुलांना त्याची भीती वाटायला नको.’ त्यानंतर त्यांनी राकेश रोशन यांना चित्रपटाची कथा विचारली. त्यांनी तिला कथा सांगितली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी तिने राकेश रोशन यांना एलियन ‘जादू’चे चित्र दाखवले.

एका दृष्याच्या चित्रीकरणासाठी 5 तास

यावर दिग्दर्शक राकेश रोशन यांनी सांगितले की, ते चित्रपट दिग्दर्शिक करत होते, मात्र त्यांना अभिनेता ह्रतिकच्या करियरविषयी चिंता वाटत होती, कारण याआधी ह्रतिकचा ‘मै प्रेम की दिवानी हूँ’ हा चित्रपट फ्लॉप झाला होता. मी माझ्या मुलाचेच करिअर धोक्यात घालत होतो. पुढे ते म्हणाले की, मला वाटले होते की, कोई मिल गया बघायलाही कोणी येणार नाही, पण जेव्हा मी ह्रतिकसोबत पहिले सिनेमाचे पहिले चित्रीकरण केले, तेव्हा माझा आत्मविश्वास 100 टक्के वाढला. कारण हा चित्रपट हिट होणार हे माझ्या लक्षात आले. या सिनेमावेळी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, कारण ‘जादू’ बोलत नव्हता. त्याच्या डोळ्यांच्या हावभावांना संवादाची जोड देणे आणि ह्रतिकसोबत ते जोडताना अडचण येत होती. एका दृष्याचे चित्रीकरण करायला 5 तास लागले.