Lok Sabha Election 2024 – मुस्लिम लीगच्या वक्तव्यावरून काँग्रेसचा मोदी, शहांवर हल्लाबोल; भाजप-आरएसएसला घेरले

जाहीरनाम्यावरून टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. ‘मुस्लिम लीग छाप’ जाहीरनामा अशी टीका मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर केली होती. त्यावरून आता काँग्रेसने मोदींना घेरले आहे. निवडणुकीत पराभव होणार या भीतीने भाजपकडून अशी मुक्ताफळे उधळली जात आहेत. या प्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगात तक्रारही केली आहे, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये गेल्या आठवड्यात शनिवारी निवडणुकीची एक प्रचार सभा झाली. यासभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली होती. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर ‘मुस्लिम लीगची छाप दिसते’, असे मोदी म्हणाले होते. यावरून काँग्रेसनेही मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे निव्वळ खोटं बोलत असल्याचे सागंत मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्लाबोल केला. ‘प्रत्येकाला माहिती आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी 1940 मध्ये मुस्लिम लीगसोबत आघाडी करून बंगाल, सिंध आणि एनडब्यूएफपी (उत्तर-पश्चिम सीमाभाग ) मध्ये आपले सरकार स्थापन केले होते’, असे म्हणत खरगे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला.

‘मोदी-शहा यांच्या राजनीतीक आणि आणि वैचारीक पूर्वजांनी स्वतंत्र्य संग्रमाात भारतीयांविरोधात ब्रिटीश आणि मुस्लिम लीगला पाठिंबा दिला होता. मोदी-शहांच्या वैचारीक पूर्वजांनी 1942 ला गांधीजींच्या ‘भारत छोडो’ आंदोलनाला विरोध केला होता. मोदींच्या भाषणातून आरएसएसचा वास येतो. भाजप दिवसेंदिवस निवडणुकीत खालची पातळी गाठत आहे. यामुळे आरएसएसला आपला जुना मित्र मुस्लिम लीगची आता आठवण येतेय’, असे म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार प्रत्युत्तर दिले.