Lok Sabha Election 2024 : मतदानापूर्वी सोनिया गांधींचे दिल्लीवासियांना आवाहन; म्हणाल्या, ‘ही निवडणूक देशाची लोकशाही आणि…’

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावतील. सहाव्या टप्प्यात दिल्लीतील 7 जागांसह देशभरातील एकूण 58 मतदारसंघात 25 मे रोजी मतदान पार पडेल. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांनी एक व्हिडीओ जारी करत दिल्लीवासियांना आवाहन केले आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन सोनिया गांधी यांनी केले आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या की, ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही निवडूणक आहे. देशातील बेरोजगारी, महागाई, घटनात्मक संस्थांवरील अतिक्रमण या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जात आहे. यात तुम्हालाही महत्त्वाची भूमिका बजवायची आहे. तुमचे प्रत्येक मत रोजगार निर्माण करेल. महागाई कमी करे, महिलांना सक्षम करेल, तसेच उज्ज्वल भविष्यात समानता आणि बरोबराचा हिंदुस्थानचा बनवेल. यासाठी दिल्लीतील सातही जागांवर काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन सोनिया गांधी यांनी केले.

दरम्यान, दिल्लीतील सर्व जागांवर 25 मे रोजी मतदान होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सर्व जागा जिंकल्या होत्या. मात्र आता भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने आघाडी केली आहे. दिल्लीत चार जागांवर आम आदमी पार्टी, तर तीन जागांवर काँग्रेस लढत आहे.