…तर अजित पवार स्वतः निवडणूक लढवतील; रोहित पवार यांचा टोला

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. राज्यासह देशात विविध पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यात बारामती मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे. या मतदारसंघात धमक्या देण्याचे प्रकाराची राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना जबरदस्त टोला लागवाला आहे.
सुरुवातील अजित पवार पक्षात आदेश द्यायचे, आता त्यांना दिल्लीचे आदेश ऐकावे लागतात. अजित पवार यांना दिल्लीपुढे झुकती भूमिका घ्यावी लागत आहे. या घटनेकडे लक्ष वेधत रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. सुरुवातील अजित पवार पक्षात आदेश द्यायचे, आता त्यांना दिल्लीचे आदेश ऐकावे लागतात. आता दिल्लीवरून आदेश आले तर काकींचा अर्ज मागे घेऊन अजित पवार यांना इच्छा नसताना अर्ज दाखल करावा लागेल आणि अजित पवार निवडणूक लढवतील, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
आता  दिल्लीवरून आदेश आले असतील तर दादा काहीपण करतील. आधी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अजित पवार हे स्वत: आदेश द्यायचे. आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतो. दिल्लीवरून आदेश आला की, तुमचा अर्ज भरा आणि काकींचा अर्ज मागे घ्या, तर अजितदादांना ते मनाविरुद्ध असले तरी ऐकावे लागेल. त्यामुळे दिल्लीच्या आदेशासमोर ते काहीही करू शकत नाहीत, असे रोहित पवार म्हणाले.