उद्धव ठाकरेंचा भाजपला जोरदार धक्का; माजी खासदार शिवाजी कांबळे शिवसेनेत दाखल

लोकसभा निवडणुकींची धामधून आता शिगेला पोहचत आहे. देशात काही ठिकाणी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचार तोफा थंडावणार आहेत. अशा वातावरणात मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. धाराशिवचे भाजपाचे नेते आणि माजी खासदार शिवाजी कांबळे यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला आहे. शिवाजी कांबळे दोन वेळा खासदार झाले आहेत. तसेच पक्षाच्या प्रदेश कमिटीत ते पदाधिकारी आहे.

शिवाजी कांबळे यांनी धाराशिव लोकसभा मतदार संघातून 1996 व 1999 साली लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. दोन्ही वेळा ते शिवसेनेत होते. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी काँग्रेस उमेदवार अरविंद कांबळे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर ते शिवसेना सोडून भाजपत गेले होते. आता पुन्हा ते स्वगृही परतत आहेत. शिवाजी कांबळे सध्या भाजपच्या प्रदेश कमिटीमध्ये पदाधिकारी होते. आता पुन्हा ते भाजप सोडून शिवसेनेत परतत आहेत.