मराठा आरक्षण समर्थनार्थ बुधवारी आळंदी बंदचे आवाहन

सकल मराठा समाजाच्या वतीने आळंदी देवाची यांच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी बंदचे आवाहन केले आहे. या बंद मध्ये सर्व व्यापारी बांधव यांनी स्वयंस्फुर्तीने आपले सर्व बाजार पेठ बंद ठेवण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्ये राज्याच्या विशेष अधिवेशनात सर्व आमदार प्रतिनिधी यांनी सगेसोयरे या विषयी अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यास साथ देण्याचे सर्व आमदार यांना सकल मराठा समाजाचे वतीने आवाहन करण्यात आले आहे.

गॅजेटचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी तसेच त्याची अंमलबजावणी करुन कायद्यात रुपांतर करण्यात यावे. यासाठी कायद्यात रूपांतर झलेल्या पूर्ण प्रक्रियेचा जी. आर. काढण्यात यावा या साठी सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. सर्वांना 100 टक्के बंद पाळण्यात यावा यासाठी जाहीर आवाहन केले आहे. या शिवाय आळंदीतील भैरवनाथ मंदिर चौकातील मंदिरात एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्याचा आळंदी व्यापारी मंडळ आणि सकल मराठा समाजाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे. सर्व व्यापारी मंडळ, आळंदी ग्रामस्थ आणि सकल मराठा समाजाच्या वतीने भैरवनाथ चौक येथे एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सर्व व्यापारी बांधव आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने आळंदी बंदमध्ये सहभागी होण्यास विनंती करण्यात आली आहे. एक दिवसीय लाक्षणिक उपोषण भैरवनाथ मंदिर येथे होणार आहे. मराठा आरक्षणासाठी लढणार्‍या आपल्या बांधवांना पाठबळ देण्यासाठी आळंदी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बाबत बैठक आळंदी मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर 14 रोजी आळंदी देवाची बाजार पेठ बंद ठेवण्याचे निवेदन आळंदी पोलीस चौकी मध्ये देण्यात आले. या निवेदनावर संतोष भोसले, प्रकाश कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, अरुण कुरे, सचिन गिलबिले, दिनेश घुले, प्रशांत कुऱ्हाडे, राजू दिवाणे, सागर भोसले, श्रीकांत काकडे, जयसिंह कदम, अर्जुन मेदनकर, शशिकांत जाधव, उमेश कुऱ्हाडे, रोहन कुऱ्हाडे, दिनेश कुऱ्हाडे, अशोक पाटील रंधवे, संतोष वायाळ यांचे स्वाक्षऱ्या आहेत.

14 तारखेला सकल मराठा समाज आळंदी देवाची यांच्या वतीने आळंदी बाजारपेठ बंदचे आवाहन करण्यात आले. व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे वतीने करण्यात आले आहे.