IPL 2024 : ताशी 156.7 किमी! मयांकच्या आईनं सांगितलं एवढ्या वेगाचं रहस्य

mayank-yadav-high-speed-ball

IPL पदार्पणातच त्याने प्रत्येक चेंडू गोळीच्या वेगाने सुस्साट टाकला. त्याच्या चेंडूंचा वेग पाहून भल्याभल्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. तेव्हा सर्वांना एकच प्रश्न पडला की, हा नेमका कौनसे चक्की का आटा खाता है ? पण आता त्याच्या वेगाचे खरे रहस्य समोर आलेय. खुद्द त्याच्या आईनेच सांगितलेय की, भाज्या खाऊनच एवढा वेग मिळवलाय मयांकने. आईच्या गौप्यस्फोटामुळे आता त्याचा डाएट प्लॅन हिंदुस्थानातील उदयोन्मुख गोलंदाजांनी फॉलो केला तर कुणाला आश्चर्य वाटणार नाही.

हिंदुस्थानी क्रिकेटची नवी ‘बुलेट एक्प्रेस’ असलेल्या मयांक यादवच्या वेगवान चेंडूंनी आयपीएलमध्ये दिग्गज फलंदाजांची झोपच उडवली आहे. आपल्या पदार्पणातील सामन्यातच मयांकने ताशी 156.7 किमी वेगाने चेंडू टाकून आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडूचा मान मिळवला होता. त्यामुळे हा स्पीडस्टार इतके दिवस कुठे लपला होता? असा प्रश्न साऱयांनाच पडला होता. तसेच इतका वेगवान चेंडू टाकणारा मयांक नेमपं खातो काय? याबाबत जाणून घेण्यासाठी साऱयांच्या मनात उत्सुकता होती. ती उत्सुकता अखेर त्याची आई ममता यादव हिनेच संपवली. तिने मयांकचा पूर्ण व्हेज डाएटच सांगून टाकला. मयांकने नॉन-व्हेज का सोडले याबाबत त्याची आई काहीही स्पष्ट सांगू शकली नाही. पण त्याची दोनच कारणे असू शकतात. एक म्हणजे तो भगवान श्रीकृष्णाला मानतो आणि दुसरे म्हणजे नॉन व्हेज त्याला पचत नव्हते, असेही तिने आवर्जून सांगितले.

ममता यादव म्हणाल्या, ‘मयांक आताच व्हेजिटेरियन बनलाय. आधी तो नॉन व्हेजिटेरियन होता, पण आता गेली दोन वर्षे शुद्ध शाकाहारी खातोय. त्याच्या डाएट प्लॅननुसार तो आम्हाला जे सांगतो ते मी बनवते. तो विशेष काही खात नाही. तो फक्त वरणभात, भाजी-चपाती, दूध आणि भाज्याच खातो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)