मैदानाबाहेर विद्यार्थ्यांना पहारा द्यायला ठेवले, आत शिक्षिकेचा विद्यार्थ्यावर बलात्कार

अमेरिकेतील मिसुरी भागातील एका शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. ही शिक्षिका लॅकी महाविद्यालयात गणित शिकवते. या याच शाळेत शिकणाऱ्या 16 वर्षांच्या विद्यार्थ्यांवर बळजबरी केल्याचा या शिक्षिकेवर आरोप आहे. शाळेच्या मैदानातच तिने या विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. हे करत असताना कोणी आत येऊ नये यासाठी तिने शाळेतील इतर विद्यार्थ्यांना मैदानाबाहेर पहारा देण्यास सांगितले होते. हेली क्लिफ्टन-कारमॅक असं या शिक्षिकेचे नाव आहे. पुलास्की काऊंटीमधल्या लॅकी महाविद्यालयात ती गणित शिकवत असून तिला टेक्सासमधून अटक करण्यात आली आहे. तिच्याविरोधात बलात्कार,बाललैंगिक छळाचे आरोप लावण्यात आले आहेत.

या सगळ्या प्रकाराचा खुलासा याच शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने या प्रकाराची वाच्यता केल्यानंतर झाला होता. ज्या विद्यार्थ्याने हे प्रकरण उघडकीस आणले त्या विद्यार्थ्याला पीडित विद्यार्थ्याने त्याच्या पाठीवर ओऱखड्यांचे फोटो दाखवले होते. पीडित विद्यार्थ्याने आपल्या मित्रांना त्याच्यासोबत क्लिफट कारमॅक या शिक्षिकेने केलेल्या प्रकाराबाबत सांगितले होते. सदर प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचण्याआधी शाळा प्रशासनाला शिक्षिका क्लिफ्टन हिच्या वर्तनाबद्दल कळालं होतं असंही कळाले आहे.

पोलिसांत हे प्रकरण पोहोचलं तेव्हा त्यांनी क्लिफ्टनची चौकशी केली. तिचा फोन जप्त करण्यात आला आणि तिला काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी क्लिफ्टनने अतिशय थंडपणे उत्तरं दिली होती, तिच्या चेहऱ्यावर किंवा तिच्या वर्तनातून ती अजिबात घाबरलेली दिसत नव्हती. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे असलयाचे तिने पोलिसांना सांगितले होते. मात्र पोलिसांनी जेव्हा फोन तपासला तेव्हा त्यांना क्लिफ्टन आणि पीडित विद्यार्थ्याचे संभाषण सापडले.

हेली ही विवाहीत असून तिला दोन मुली आहेत. हेलीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. नवरा सतत अनैसर्गिक संभोगाची मागणी करत अ सल्याने हेलीने त्याच्यापासून घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचे कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांतून दिसून आले आहे. हेली शाळेमध्ये उत्तान कपडे घालून येत होती असंही या कागदपत्रांत म्हटले आहे. या सगळ्या प्रकरणात धक्कादायक वळण तेव्हा लागलं जेव्हा मुलाच्या बापालाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती. बापाला शिक्षिकेने आपल्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचं कळालं होतं, मात्र त्याने याबाबत पोलिसांना कळवलं नव्हतं. हेली पीडित विद्यार्थ्याच्या घरीही आली होती तेव्हाही बापाने तिला अडवलं नव्हतं असंही पोलिसांना कळालं आहे.