मी दहशतवादी नाही…माझे नाव अरविंद केजरीवाल आहे; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा तुरुंगातून जनतेला संदेश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार कारागृहात आहे. तुरुंगात त्यांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपचे खासदार संजय सिंह यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तुरुंगात केजरीवाल यांच्यावर अत्याचार होत आहेत. त्यांना योग्य ती वागूक मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आता केजरीवाल यांनी तुरुंगातून जनतेला संदेश पाठवला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझं नाव अरविंद केजरीवाल आहे, मी दहशतवादी नाही, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे. यावरून संजय सिंह यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

अरविंद केजरीवाल यांना दहशतवाद्यांप्रमाणे वागवण्यात येत आहे. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबाची भेट काचेच्या भिंतीतून केली जात आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना झेड प्लस सुरक्षा आहे, ते केजरीवाल यांना भेटले तेव्हा त्यांच्यामध्येही काचेची भिंत होती. केजरीवाल यांना अशी वागणूक का देण्यात येत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. या कारवाईतून भाजपचा केजरीवाल यांच्याबाबतचा द्वेष दिसत आहे, असेही संजय सिंह म्हणाले. केजरीवाल यांना 24 तास सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे. त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा अपमान केला जात आहे. मात्र, अशा प्रकारामुळे केजरीवाल डगमगणार नाहीत, ते आणखी मजबूत होतील, असे संजय सिंह यांनी सांगितले.

पंजबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केडरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले की, दोन मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसारखी भेट होऊ दिली नाही. आम्हाला दहशतवाद्यांसारखं भेटवण्यात आले. ही हुकूमशाही आहे. हार्ड कोर गुन्हेगारांना मिळणाऱ्या सुविधाही केजरीवाल यांना मिळत नाही. मला काचेतून त्यांच्याशी फोनवर बोलायला सांगितले. काचेतून त्यांचा चेहराही नीट दिसत नव्हता. त्यांना अशी वागणूक का दिली जात आहे, असा सावलही मान यांनी केला आहे.