तरुणांना डोळ्यासमोर ठेवत HP ने बाजारात आणले दोन नवे लॅपटॉप

HP computer

तरुणांची आवड-निवड लक्षात घेऊन एचपी कंपनीने एचपी 14 आणि एचपी15 हे दोन नवे लॅपटॉप बाजारात आणले आहेत. एफएचडी कॅमेरा, क्यूएचडी डिसप्ले आणि फिंगरप्रिंट रीडर असलेले हे लॅपटॉप असून यूएसबी-सी पोर्ट्स, यूएसबी-सी पॉवर अडाप्टरची सोय, एचडीएमआय व हेडफोन जॅकची सुविधाही या लॅपटॉपमध्ये आहे. पॅव्हिलियन प्लस 14 लॅपटॉपचे वजन केवळ 1.39 किलोग्रॅम आहे. हा लॅपटॉप हाताळायला आणि वापरायला सोपा आणि आधुनिक आहे. हा लॅपटॉप नॅचरल सिल्व्हर, रोझ गोल्ड, वॉर्म गोल्ड आणि स्प्रुस ब्ल्यू या चार रंगात उपलब्ध आहे.

एचपी इंडियाच्या पर्सनल सिस्टम्स विभागाचे वरिष्ठ संचालक विक्रम बेदी म्हणाले,“भारतातील वैयक्तिक कॉम्प्युटर वापरणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तरूण वर्ग कामासाठी, शिक्षणासाठी तसेच मनोरंजनासाठी पीसींचा वापर करू लागले आहेत. हे ओळखून आम्ही तरुणांना तसेच आधुनिक ग्राहकांना काय हवं आहे याचा सातत्याने विचार करत असतो. आम्ही मल्टी-टच तसेच अनेक पोर्ट्सची सुविधा एचपी पॅव्हिलियन 14 लॅपटॉपमध्ये उपलब्ध करून दिली आहे. वापरायला सोपे, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असे हे लॅपटॉप परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.

या लॅपटॉपचे वैशिष्ट्य म्हणजे हे लॅपटॉप समुद्रात फेकून दिलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर करून तयार करण्यात आली आहे. एचपी 14 नोटबुकची किंमत 39999 रुपयांपासून पुढे आहे. एचपी पॅव्हिलियन एक्स360 ची किंमत ही 57999 पासून पुढे आहे. एचपी पॅव्हिलियन प्लसची किंमत 81999 पासून पुढे आहे.