निफ्टीने रचला नवा इतिहास, 20 हजार अंकांची पातळी ओलांडली

निफ्टी या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निर्देशांकाने सोमवारी संध्याकाळी नवा इतिहास रचला. दिवसाचा व्यवहार संपण्याच्या काही शेवटच्या मिनिटांत निफ्टीने 20 हजार अंकांची पातळी ओलांडली. कामकाज बंद झालं तेव्हा मात्र या अंकात घट पाहायला मिळाली.

बीएसई सेन्सेक्समध्येही सोमवारी 500हून अधिक अंकांची वाढ झाली. त्यामुळे हा सेन्सेक्स 528.17 अंकांच्या वाढीने 67,127.08 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीत 176.40 अंकांच्या वाढीसह 19, 996.35 अंकांच्या पातळीवर बंद झाला. दिवसभराच्या कामकाजादरम्यान 20, 008.15 अंकांची उच्चांकी पातळी ओलांडली.

यामुळे बीएसई सेन्सेक्समधील अॅक्सिस बँक, पॉवर ग्रीड आणि मारुतीचे शेअर्स दोन टक्क्यांनी वाढले. याखेरीज एसबीआय, टाटा मोटर्स, आयटीसी, नेस्ले इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, टीसीएस आणि एनटीपीसी यांच्या शेअर्समध्येही वाढ झालेली पाहायला मिळाली.