सायबर तक्रार आता फोनवरूनही

ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अशा सायबर गुह्यांचा छडा लावण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी 837 कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पामुळे नागरिकांना दिवसातून चोवीस तासांत कधीही सायबरसंदर्भातील तक्रार फोनवरूनही नोंदवता येणार आहे. सायबर गुह्यासंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी कॉल सेंटर कार्यरत असेल. नागरिकांनी केलेल्या तक्रारींचा अत्याधुनिक सायबर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपास केला जाईल, जेणेकरून गुह्याचा मुळापर्यंत जाऊन गुन्हा उघड करणे व गुन्हा सिद्ध करून शिक्षेचे प्रमाण वाढविण्यास मदत होणार आहे.