विसरभोळे विमान प्रवासी! मुंबई विमानतळावर 49 हजारहून अधिक वस्तू प्रवासी विसरले

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे प्रवाशी विसरभोळे असल्याचे समोर आले आहे. गेल्या अकरा महिन्यांत तब्बल 49 हजार 485 प्रकारच्या वेगवेगळय़ा वस्तू प्रवासी विसरले आहेत. त्यापैकी 8 हजार 201 वस्तू विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना परत केल्या आहेत. सर्वाधिक विसरलेल्या वस्तूमध्ये इयर पह्न, चार्जर आणि चष्म्यांच्या समावेश आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज सुमारे एक हजारपेक्षा जास्त विमानांची ये-जा होत असून त्या माध्यमातून सुमारे दीड लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवासादरम्यान प्रवासी अनेक वस्तू विमानतळावरच विसरतात. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 49 हजारहून अधिक वस्तू बेवारसपणे विमानतळावर आढळल्या आहेत. या वस्तूपैकी आठ हजार वस्तू संबंधित प्रवाशांना परत केल्या आहेत.

लॉस्ट अॅण्ड फाऊंड पथक कार्यरत
विमान प्रवाशांचे विसरलेले सामान ठेवण्यासाठी विमानतळ प्रशासनाची लॉस्ट अँड फाऊंड पथक कार्यरत आहे. हे पथक बॅग, पाकीट, आधार कार्ड आणि मोबाईल पह्न याद्वारे प्रवाशांची ओळख पटवून सामान परत करते. इलेक्ट्रॉनिक वस्तू 90 दिवस विमानतळ प्राधिकरणाकडे ठेवतात, त्यानंतर त्या सीमा शुल्क विभागाकडे हस्तांतरित करतात.

 रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार विनायक राऊत, सरचिटणीस दिवाकर देव, कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर. के. यादव माटुंगा वर्कशॉकमध्ये आलेले असताना त्यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या वतीने कामगारांसाठी असलेल्या चार बायोमेट्रिक फेस रिडिंगपैकी मधल्या दोन फेस रिडिंग रद्द कराव्यात, माटुंगा कारखान्यामध्ये यांत्रिक, विद्युत व कार्मिक कर्मचार्यांची भरती करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी रेल कामगार सेनेचे चंद्रकांत विनरकर, दिनेश खंडाळे, दत्ता अदाते, सचिन गुरखे, वैभव आत्तरदे, मिलींद पाटील, गोपाल बहाले, राजेंद्र चौधरी, नरेंद्र यादव आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात तातडीने उपचार करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा मारुती कदम यांना यंदाचा द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचा ‘द्रोणागिरी भूषण पुरस्कार – 2023’ देऊन सन्मानित करण्यात आले. माजी आमदार मनोहरशेठ भोईर, असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, जेएनपीटीचे माजी विश्वस्त भूषण पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी पत्रकार मिलिंद खार-पाटील, प्रकाश कदम, पोलादपूर तालुका प्रमुख अनिल मालुसरे, तालुका सहसंपर्क प्रमुख ज्ञानोबा बांदल आदी उपस्थित होते.