मालमत्ता कर भरा नाहीतर दोन टक्के दंड, मालमत्ता जप्त करणार!

bmc

थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलली असून आता 25 मेपर्यंत कर भरला नाही तर दोन टक्के दंड आणि मालमत्ता जप्तीची कारवाईदेखील होऊ शकते. दरम्यान, 1 एप्रिल 2023 ते 15 एप्रिल 2024पर्यंत तब्बल 3,398 कोटींचा कर जमा झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर 1 एप्रिल 2024 ते आतापर्यंत 200.89 कोटींचा कर जमा झाला आहे.

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत करभरणा करता यावा, यासाठी महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाच्या वतीने वेळोवेळी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. मालमत्ता धारकांच्या सोयीसाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही विभाग (वॉर्ड) कार्यालय तसेच नागरी सुविधा पेंद्र सुरू ठेवण्यात आले आहेत. तसेच यासंबंधी अडचणींचा निपटारा करण्यासाठी कर निर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी अविरत कार्यरत आहेत. तरी अद्याप करभरणा न केलेल्या मालमत्ता धारकांनी वेळीच कर जमा करून दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.