मध्य-पूर्वेवरून उडताना विमानांचा GPS सिग्नल गमावल्याचा घटना, DGCA नं दिला धोक्याचा इशारा

airoplane

नागरी विमाने काही वेळा मध्यपूर्वेतील काही भागांवरून उड्डाण करताना GPS सिग्नल मिळत नसल्याच्या वृत्तामुळे नागरी विमान वाहतूक नियामक DGCA ने सर्व हिंदुस्थानातील विमान कंपन्यांना एक सल्ला जारी केला आहे. अलिकडच्या काही दिवसांत असे अनेक अहवाल आले आहेत की नागरी विमाने मध्यपूर्वेतील काही भागांवरून उड्डाण करतात तेव्हा त्यांच्या नेव्हिगेशन सिस्टमची फसवणूक केली जाते. सुरक्षेसंदर्भातील हा एक मोठा धोका आहे असून DGCA कडून विमान कंपन्यांना धोक्याचा इशारा दिला आहे.

‘नवीन धमक्यांमुळे आणि GNSS (ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम) जॅमिंग आणि स्पूफिंगच्या वृत्तांमुळे विमान वाहतूक उद्योग अनिश्चिततेशी झुंजत आहे’, असं देखील परिपत्रकात म्हटलं आहे.

अलीकडच्या काळात मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्रावरील GNSS हस्तक्षेपाच्या वाढत्या अहवालांची नोंद घेतली आहे आणि नेव्हिगेशन सिस्टीमच्या जॅमिंगला सामोरे जाण्यासाठी आकस्मिक उपाय विकसित करण्याचं आवाहन केलं आहे. DGCA ने थ्रेट मॉनिटरिंग आणि अॅनालिसिस नेटवर्क तयार करण्याचीही मागणी केली आहे.

सप्टेंबरच्या उत्तरार्धात, इराणजवळील अनेक व्यावसायिक उड्डाणे त्यांच्या नेव्हिगेशन सिस्टीम गंडल्यानंतर ठप्प झाली. स्पूफिंगला बळी पडलेल्या विमानांपैकी एक विमान परवानगीशिवाय इराणच्या हवाई हद्दीत जवळजवळ उड्डाण करत होते. या घटनेनंतर DGCA नं इशारा जारी केला आहे.