Poonam Pandey – मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडेचे निधन, इन्स्टाग्राम पोस्टबाबत लोकांना शंका

विविध वादांमुळे प्रसिद्धीझोतात आलेली मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिचे निधन झाल्याचे कळते आहे. गर्भाशयाच्या कर्करोगामुळे (cervical cancer) तिचे निधन झाल्याची पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर अपलोड करण्यात आली आहे. पूनम पांडे ही सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी राहिली असल्याने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून करण्यात आलेल्या पोस्टवर अनेकांना विश्वास बसलेला नाहीये. अपेक्षा आहे की ही पोस्ट खोडसाळपणा नसावा अशी प्रतिक्रिया तिच्या हँडलवरून करण्यात आलेल्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

उत्तान फोटोशूट, नग्न फोटोशूट, पॉर्नोग्राफीमध्ये कथित सहभाग यामुळे पूनम पांडे सातत्याने चर्चेत असायची. तिच्या बोल्ड वर्तनामुळे तिला चित्रपटांतही काम मिळाले होते, मात्र तिला चित्रपटात म्हणावे तसे यश मिळाले नाही. पूनम पांडे हिचे सॅम बॉम्बे नावाच्या व्यक्तीशी लग्न झाले होते. सॅम आपल्याला बेदम मारहाण करायचा, आपल्यावर निर्बंध घालायचा, सतत संशय घ्यायचा असा आरोप पूनमने केला होता. त्याच्या मारहाणीमुळे आपल्याला ब्रेन हॅमरेजही झाले होते असा दावा तिने केला होता.

पूनम पांडे हिचा जन्म 11 मार्च 1991 रोजी दिल्लीत झाला होता. तिने पूर्वीपासून मॉडेलिंग क्षेत्रात यायाचं निश्चित केलं होतं. अर्धनग्न व्हिडीओमुळे ती प्रकाशझोतात आली होती. 2011 साली झालेला विश्चषकापूर्वी तिने जाहीर केलं होतं की टीम इंडियाने ही स्पर्धा जिंकली तर ती अंगावरील सगळे कपडे उतरवेल. ‘नशा’ चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पाय ठेवला होता. यानंतर तिने अन्य दोन चित्रपटांतही काम केले मात्र तीनही चित्रपट सपाटून आपटले होते. पूनमने दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँगही केली होती. तिने दावा केला होता की तिला या गाण्यांसाठी 5 कोटी रुपये मिळायचे, मात्र त्यावर अनेकांनी विश्वास ठेवला नव्हता.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्तन, फुफ्फुसाच्या कर्करोगानंतर स्त्रियांमध्ये आढळणारा चौथा सर्वात जास्त कर्करोग आहे. जगातील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळपास एक चतुर्थांश मृत्यू हिंदुस्थानात होतात. दरवर्षी जगभरात अंदाजे एक लाख 25 हजार महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान होते.