बाप्पा मोरया!! पीओपीवरील बंदी उठवल्याने मुर्तीकामाला वेग, मंडळांनाही दिलासा

गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने मूर्तिकारांची आणि गणेश मंडळांची लगबग वाढली आहे. मंडळांनी सजावट आणि बैठका घेत यंदाच्या गणेशोत्सवाचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी पीओपीवरील बंदीची चर्चा होती. त्यामुळे मुर्तीकारांमध्ये चिंतेचे वातावरण होते.मात्र, ही बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि मुर्तीकार आणि मंडळांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

यंदाही पीओपी मूर्तींची आयात मुंबईत केली आहे. अनेक मंडळांनी तर या मूर्तींचे बुकिंगही केले आहे. पीओपी मूर्तींवरी बंदीमुळे मूर्तीकारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र आता पीओपी मूर्तींवरील बंदी उठवल्याने मूर्तीकारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे तर या मूर्तींचे बुकींग वाढत आहे. यंदा 19 सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. पीओपीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचेही नुकसान होत आहे. घरगुती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी शहरात दोन लाखांहून अधिक मूर्तींची गरज असते. मुंबईत 60 ते 70 हजार गणेशमूर्ती बनवण्यात येतात. पेण, पनवेल या ठिकाणांहून मुंबईत दरवर्षी गणेशोत्सवात दीड लाख पीओपीच्या मूर्तीं येतात.

पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने मूर्तिकारांना नियम बनविले आहेत. त्यामध्ये घरगुती गणेशमूर्ती 2 ते 4 फूट उंच असावी. शाडूच्या मातीची असावी. शिवाय शाडूची मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना जागा आणि माती प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर मोफत पुरवली जाणार आहे. पीओपीने पर्यावरणाची हानी होत असल्याने त्यावर बंदी घालण्याची चर्चा होती. मात्र, पीओपीला पर्याय काय आणि याबाबतचे धोरण स्पष्ट नसल्याने यावर्षीसाठी ही बंदी उठवण्याची मागणी होत होती. ही बंदी ठवण्यात आल्याने मूर्तीकारांच्या कामाला वेग आला आहे.