गद्दारांना जनता माफ करीत नाही; हा इतिहास आहे – पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्रातील जनता गद्दारांना कधीही माफ करत नाही, हा इतिहास आहे. तर माझे नाव घेऊन जे मोठे झाले व ज्यांनी काँग्रेस पक्षाबरोबर व माझ्याशी गद्दारी केली, त्या गद्दाराला खटाव- माणची जनता देखील माफ करणार नसल्याचे सूतोवाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

खटाव तालुक्यातील येळीव येथील हरणाई सूतगिरणी कार्यस्थळावर झालेल्या ‘जनसंवाद यात्रा’ नियोजन समितीच्या बैठकीत चव्हाण बोलत होते. प्रदेश काँग्रेसचे राजेंद्र शेलार, एम. के. भोसले, खटाव-माण गेले. विधानसभा अध्यक्ष डॉ. महेश गुरव, राजूभाई मुलाणी, डॉ. संतोष गोडसे, बाबासाहेब माने, नकुसाताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

चव्हाण म्हणाले, ‘आमच्या ” काळात खटाव-माण तालुक्यांत साखळी बंधारे मोठ्या प्रमाणात बांधले. सिंचन योजनेच्या कामांना गती दिली, ही सर्व कामे आपल्या माध्यमातून करून घेऊन शेवटी गद्दारी करत स्थानिक आमदार इतर पक्षात गेले. खटाव- माणची जनता सुज्ञ असून, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत गद्दारांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. रणजितसिंह देशमुख म्हणाले, माण तालुका हा कायमच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात अनेक कामांना गती मिळाली.

प्रत्येक तालुक्यातील गावागावांत ही जनसंवाद यात्रा जाणार असून, तेथील लोकांना काँग्रेसची ध्येयधोरणे आणि महत्त्व पटवून देण्यासाठी या यात्रेचे नियोजन केले आहे. याप्रसंगी शिवाजीराव यादव, अमरजित कांबळे, अॅड. प्रल्हाद सावंत यांच्यासह माण तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.