Pune crime news – जबरदस्तीने मोबाईल हिसकवणारे अटकेत, येरवडा पोलिसांकडून मोबाईल जप्त

दुचाकीवरून बसस्टॉपवर थांबलेल्या प्रवाशाजवळ येऊन जबरदस्तीने मोबाईल हिसकवणार्‍या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून चोरीचा मोबाईल, दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

सोमेश सुभाष कुसाळे (वय – 25, रा. टिंगरेनगर), संतोष गरिबदास खंडागळे (वय – 31, रा. येरवडा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, 31 ऑगस्ट रोजी फिर्यादी हे गुंजन चौक परिसरात बसस्टॉपवर थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळील मोबाईल हिसकावून पळ काढला. तेव्हापासून येरवडा पोलीस आरोपींच्या मागावर होते. या दरम्यान गुन्ह्य्यातील संशयीत आरोपी हे विश्रांतवाडी भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल, दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक कांचन जाधव, जयदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार अमजद शेख, अनिल शिंदे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.