हा माझा अखेरचा वर्ल्ड कप – डी कॉक

दक्षिण आफ्रिकेने आयसीसी वर्ल्ड कपसाठी मंगळवारी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मात्र संघाची घोषणा होताच दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने ‘आता हा माझा अखेरचा वर्ल्ड कप’ असे स्पष्ट करीत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

30 वर्षीय क्विंटन डी कॉकने नुकताच बिग बॅश लीगमध्ये करार केलाय. त्यामुळे त्याने अचानक एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ट्रिस्टन स्टब्स आणि डेवाल्ड ब्रेविस या युवा फलंदाजांची वर्ल्ड कप संघात निवड झालेली नाही. या दोघांची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली होती, मात्र दोघांनाही वर्ल्ड कप संघात स्थान मिळू शकले नाही. आता डी कॉक हा दक्षिण आफ्रिकेला पहिला विश्वचषक जिंकून देण्यासाठी मैदानावर जिवाचे रान करताना दिसेल. डी कॉकने वन डे क्रिकेटमधील पहिला सामना 2013 मध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळला होता. त्याने आतापर्यंत 140 एकदिवसीय सामने खेळले असून 44.85 च्या सरासरीने 5,966 धावा केल्या आहेत. 178 च्या सर्वोत्तम स्कोअरसह त्याने 17 शतके आणि 29 अर्धशतके केली आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 96.08 आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सात वेळा नाबाद राहिला आहे. क्रिकेटच्या या प्रकारात त्याने 687 चौकार आणि 93 षटकारही ठोकले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड कप संघ ः टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जानसेन, हेन्रीक क्लासेन, सिसांडा मगला, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, कारिचबा नॉर्किया, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर डसेन.

ऑक्टोबर महिन्यात जपानमध्ये होणाऱया दहाव्या केडब्ल्यूएफ जागतिक कराटे अजिंक्यपदात सहभागी होणाऱ्या 9कराटेपटू आणि अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी राज्यपालांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आणि त्यांना पदके जिंकून आणण्यासाठी शुभेच्छा दिल्या.