पान टपरीवाल्याकडे दोन किलो सोने  

राजस्थानच्या बिकानेरमधील मार्केटमध्ये सध्या एका पान टपरी चालवणाऱया बाबाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. पान टपरी जुनी आणि छोटीशी असली तरी या बाबाच्या अंगावर तब्बल दोन किलो सोने आहे. या सोन्याची किंमत जवळपास दोन कोटी रुपये इतकी आहे. गळय़ात सोन्याचा हार, हातात सोन्याचे कडे, कानात सोन्याचे पुंडलसारखे सोने परिधान करून हा बाबा आपली पानाची टपरी उघडतो. हे दुकान जवळपास 93 वर्षे जुने आहे. याआधी मूलचंद आणि फूलचंद नावाचे दोघे भाऊ हे दुकान चालवत होते. या ठिकाणी वेगवेगळी पाने खायला मिळतात. लांबून लोक या ठिकाणी येतात. एका पानाची किंमत 15 ते 20 रुपये आहे. मूलचंद यांना सोने परिधान करणे आवडते. त्यामुळे ते सोने घालून पान टपरी चालवतात.