India vs England टीम इंडियाला मोठा धक्का, अश्विनची चालू सामन्यातून अचानक माघार

इंग्लंडविरूद्ध राजकोट येथे सुरू असलेल्या सामन्यातून हिंदुस्थानचा आघाडीचा फिरकी गोलंदाज आर.अश्विन याने माघार घेतली आहे. कुटुंबात काहीतरी अडचण निर्माण झाल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. (R Ashwin withdraws from the 3rd India-England Test due to family emergency.) आजच्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अश्विनने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. आजच अश्विनने 500 वा बळी टीपला होता. मात्र कुटुंबातील अडचणीमुळे त्याचा हा आनंद फार काळ टीकला नाही. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली असून या आव्हानात्मक प्रसंगी आम्ही अश्विन आणि त्याच्या कुटंबियांसोबत असल्याचे बीसीसीआयने X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अश्विनच्या कुटुंबामध्ये नेमकी काय अडचण निर्माण झाली आहे हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. मात्र त्याने सामन्यातून माघार घेतल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. अश्विनच्या जागी संघात कोणाला घेणार याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाहीये.