मणिपूर हिंसाचाराचा प. बंगाल विधानसभेत निषेध

मणिपूरमधील हिंसाचाराचा निषेध करणारा ठराव सोमवारी पश्चिम बंगाल विधानसभेत संमत करण्यात आला. भाजप आमदारांकडून विरोध सुरू असताना राज्याचे विधिमंडळ कामकाज मंत्री सोवनदेव चट्टोपाध्याय यांनी हा ठराव वाचून दाखवला. पंतप्रधानांनी मणिपूरबद्दल निवेदन करायला हवे. विदेश दौऱयावर जाऊ शकणारे पंतप्रधान मणिपूरला जात नाहीत ही लाजिरवाणी बाब असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मणिपूर हिंसाचाराबाबत भाजप आणि पेंद्र सरकारची निंदा करत सांगितले. तेथे शांतता पुनर्स्थापित करणे पंतप्रधानांना शक्य नसेल तर आम्हाला इंडियाला शांतता स्थापन करण्याची अनुमती द्यावी, असे ठरावावर बोलताना बॅनर्जी म्हणाल्या.