प्रसिद्ध अभिनेत्री आई होणार, सोशल मीडियावरुन दिली माहिती

रिचा चढ्ढा आणि अली फजल हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहे. लॉकडाऊनच्या काळात या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघेही त्यांच्या लव्हस्टोरी आणि अप्रतिम केमिस्ट्रीमुळे सतत चर्चेत असतात.  हे जोडपे आईबाबा होणार असून यामुळे हे दोघे पुन्हा एकता प्रकाशझोतात आले आहेत. या जोडप्याने सोशल मीडियातून चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी शेअर केली आहे

 

View this post on Instagram

 

A post shared by ali fazal (@alifazal9)

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. हे दोघेही लवकरच बाळाचे स्वागत करण्यासाठी अधीर झाले आहेत. या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. या दोघांनी दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत 1 + 1 = 3 असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत त्यांनी दोघांचा एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अलीने रंगीत शर्ट आणि पांढरा ओव्हरकोट घातलेला दिसत आहे, तर रिचाने फ्रिल स्लीव्हजसह काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. चित्राच्या खाली गर्भवती महिलेचा इमोजी देखील आहे.

रिचा आणि अलीच्या घरी येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी नेटकऱ्यांनी देखील भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांचे चित्रपटसृष्टीतील सहकलाकार श्वेता बसू प्रसाद, श्रिया पिळगांवकर, हिमांशी चौधरी, नताशा भारद्वाज, हर्षित शेखर गौर आणि इतर मित्रांनी देखीाल जोडप्याचे अभिनंदन केले आहे. 4 ऑक्टोबर, 2022 ला हे दोघे लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या दोन वर्षानंतर हे दोघे आता आई-वडील होणार आहेत.