देशाला पर्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, फक्त तुम्ही साथ द्या!

भारत देशाने अनेक सरकारे पाहिली आहेत. वैचारिक दृष्टीने त्यांची वेगळी भूमिका होती, विकासाचा विचार होता म्हणून लोकशाही टिकली होती. अलीकडे सगळी परिस्थिती बदलली आहे. सगळीकडे हुकूमशाही सुरू आहे. देशाची घटना बदलण्याचा घाट घातला जात आहे. सामान्य माणसाचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाला पर्याय देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, फक्त साथ तुमची हवी आहे. बदलाची सुरुवात तुमच्यापासून करू या, अशी साद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निफाड येथील विराट महाएकजुट सभेत घातली.

निफाड येथे आयोजित महाएकजूट सभेच्या मंचावरून शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मी पेंद्रात मंत्री असताना दीड महिना पुरेल एवढा अन्नधान्य पुरवठा उपलब्ध आहे अशी फाईल आली होती. त्यावर कृषीप्रधान देशात ही वेळ येणे ही दुर्दैवी बाब आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात धान्य आयात करण्याची मागणी झाली. ते आयात केल्याने मी व्यथित झालो. ही स्थिती बदलण्याचा निर्णय घेतला तेव्हा एका शेतकऱयाने आत्महत्या केल्याची बातमी आली, आम्ही त्या कुटुंबाची भेट घेतली. काय झाले विचारलं तर मुलीचे लग्न ठरले, सावकाराचे कर्ज घेतले होते. त्याने तगादा लावला. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही एक आठवडय़ात शेतकऱयांवरील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता, असे शरद पवार पुढे म्हणाले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, इतिहास लढणाऱयाचा लिहिला जातो, गद्दारांचा नाही. मराठी माणसांचा इतिहास तेच सांगतोय की गद्दार लोकांना माफी नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर आज राममंदिर उभे राहिले नसते. निवडणूक आली नवीन जुमला तयार करायचा, द्राक्ष पंढरीत शेतकऱयांवर संकट आले तेव्हा कोणी आले नाही. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार संजय राऊत, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आदींसह महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.