चंद्रपूरमध्ये बोलघेवडय़ा योजनांचा भंडाफोड

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधील वरोरा-भद्रावती विधानसभेतील भद्रावती या ठिकाणी ‘होऊ द्या चर्चा’ मोहिमेत सर्व स्तरातील नागरिकांनी सहभाग घेतला होता. शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांनी मार्गदर्शन करत केंद्र आणि राज्य सरकारच्या बोलघेवडय़ा योजनांचा भंडाफोड केला.

यावेळी जिल्हाप्रमुख महिला आघाडी नर्मदा बोरेकर, विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, महिला उपजिल्हाप्रमुख माया नारळे, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, भद्रावती तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, पूर्व विदर्भ युवासेना सचिव, सिनेट सदस्य नीलेश बेलखेडे, युवती सेना जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, युवासेना प्रमुख राहुल मालेकर, भद्रावती तालुकाप्रमुख युवती सेना जिल्हा समन्वयक अश्लेषा भोयर, भद्रावती महिला शहरप्रमुख माया टेकाम, तालुका उपसंघटिका शीला आगलावे, भद्रावती शहर समन्वयक भावना खोब्रागडे, युवती सेना उपजिल्हाधिकारी शिव गुडमल, भद्रावती तालुका युवती अधिकारी नेहा बनसोड तसेच युवासेना, अन्य अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, भायखळा सहसंघटक सूर्यकांत पाटील, युवासेना मुंबई समन्वयक अमित जाधव व चंद्रपूर लोकसभेतील प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र. 104 च्या वतीने मुलुंड भाजी मार्केटवरील आर. आर. टी रोडवर बीएमसी कॉलनी, तांबेनगर वसाहत येथे ‘होऊ द्या चर्चा’ ही मोहीम राबवली गेली. लोकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य राजोल पाटील, उपविभागप्रमुख दिनेश जाधव, सीताराम खांडेकर, उपविभाग संघटक नंदिनी सावंत, शीतल पालांडे, शाखाप्रमुख राजेश साळी शेलार, शाखा संघटक प्राजक्ता साळवी, सुनील गारे, रोहिदास देवाडे आदी उपस्थित होते.

अंधेरी

अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वतीने प्रभाग क्रमांक 65 धाकूशेठ पाडा येथे ‘होऊ द्या चर्चा’ मोहीम राबवण्यात आली. यावेळी स्थानिकांनीही यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी उपविभागप्रमुख प्रसाद आयरे, उपविभाग संघटिका संजीवनी घोसाळकर, दयानंद कड्डी, शाखा संघटक सुनंदा नांदगावकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे कक्ष संघटक रमेश मालवणकर, उपशाखाप्रमुख धनेश कदम, दिनेश उप्पल, युवासेनेचे पदाधिकारी प्रसाद मोगरे, स्वप्नील बिरमबोळे, दीपेश तावडे, अमरीश शेलाणकर उपस्थित होते.

मांडवी-कोळीवाडा, मस्जिद बंदर

मांडवी-कोळीवाडा, मस्जिद बंदर येथे ‘होऊ द्या चर्चा’ मोहीम राबवण्यात आली. यावेळी शिवसेना दक्षिण विभागप्रमुख संतोष शिंदे, कुलाबा विधानसभाप्रमुख विकास मयेकर, उपविभागप्रमुख बाजीराव मालुसरे, विधानसभा उपविभाग संघटक, विजय साखरे, दिलीप करंदेकर, प्रवीण जुवाटकर, शाखाप्रमुख स्वप्नील कोळी, महिला संघटक रंजना एकवडे यांच्यासह विभागातील रहिवासी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.