आता भाव देत नसल्याने त्याची सटकली; एकीच्या नावे बनावट इन्स्टा खाते खोलून दुसरीची बदनामी

तिने मैत्री तोडली, आता ती भाव पण देत नसल्याने त्याची सटकली. त्याने तिला त्रास द्यायचे ठरवले आणि चुकीचे पाऊल उचलले. एका मैत्रिणीच्या नावाने बनावट इंस्टा खाते खोलून त्याद्वारे त्या मैत्रिणीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवले. मुलाने विकृत कृत्य केले, पण त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले.

आरोपी मुलगा अल्पवयीन असून या प्रकरणातील पीडित मुली देखील अल्पवयीन आहेत. आरोपी मुलगा आणि दोन मुली यांच्यात मैत्रीचे संबंध होते. पण काही कारणास्तव त्यांच्या मैत्रीत कटुता आली. त्यामुळे मुलींनी मुलांपासून फारकत घेतली. पूर्वीप्रमाणे मुली आपल्याशी बोलत नसल्याने मुलाची सटकली होती. मुलींना अद्दल घडविण्यासाठी त्याच्या डोक्यात नको ते विचार येऊ लागले. अखेर मुलाने पहिल्या मैत्रिणीच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट खाते खोलले. मग ज्या मुलीला त्रास द्यायचा आहे तिचे मॉर्फ केलेले बनावट अश्लील पह्टो बनवून त्या बनावट खात्यावरून प्रसारित केले. ही बाब मुलीच्या आईला समजताच त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी विनयभंग व पॉक्सोचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-8 ने देखील समांतर तपास सुरू केला.

उपायुक्त राजतिलक रोशन, सहाय्यक आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक लक्ष्मीकांत सांळुखे, सपोनि मधुकर धुतराज तसेच यादव, सावंत, रहेरे व गायकवाड यांनी आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान हे विकृत कृत्य मुलींच्या एकेकाळच्या मित्रानेच केल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने त्या दोघा मुलांना शोधून आणून चौकशी केल्यावर एकाने गुह्याची कबुली दिली. त्या मुलावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली.

 

श्रीमान योगी प्रतिष्ठान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक 111 तसेच भांडुप गाव वारकरी संप्रदाय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ शिवसैनिक व प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शेषराव चक्रनारायण यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आमदार सुनील राऊत, हभप संतोष सावरटकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून ‘समाजरत्न 2023’ पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे, नंदकुमार गावंडे, कामगार नेते संदीप राऊत, विधानसभा संघटक संदीप सावंत, शाखाप्रमुख दीपक सावंत, दत्ताराम पालेकर, उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव, गोपीनाथ पाटील, अनंत पाताडे, मिलिंद चक्रनारायण, नंदकुमार पवार, मारुती कुदळे उपस्थित होते.