व्यापाऱ्याची फसवणूक करणारा गजाआड

ऑनलाइन बँकिंगच्या नावाखाली व्यापाऱ्याची 19 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी अटक केली. सत्येंद्र राजावत आणि मुकेश चौधरी अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. त्याच्या कंपनीचे व्यवहार आरटीजीएस आणि चेकद्वारे होतात. मे महिन्यात त्याच्या खात्यातून 19 लाख रुपये दुसऱया खात्यात वळवले. पैसे गेल्याचे लक्षात येताच त्याने दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांना एका आयपी पत्त्याची माहिती मिळाली. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. पोलिसांचे पथक हे राजस्थान येथे गेले. पोलिसांनी सत्येंद्रला ताब्यात घेतले.

त्याने एकाला क्लाऊड सर्व्हिस घेतली होती. ते क्लाऊड हे एकाला व्हॉट्सअॅपद्वारे दिल्याचे समोर आले. सत्येंद्रच्या चौकशीत मुकेशचे नाव समोर आले. त्या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलिसांनी सत्येंद्र आणि मुकेशकडून एक मोबाईल हस्तगत केला आहे. त्या दोघांनी स्वतःची ओळख लपवण्यासाठी व्हीपीएन प्रणालीचा वापर केला होता अशी माहिती समोर आली आहे. त्या दोघांनी आतापर्यंत किती जणांना सर्व्हर वापरण्यास दिले होते, याचा तपास पोलीस करत आहेत.