लखनऊच्या आदित्य श्रीवास्तवची यशोगाथा

 

लखनऊमध्ये राहणाऱया आदित्य श्रीवास्तव याने वयाच्या 26 व्या वर्षी यूपीएससीच्या परीक्षेत देशात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. आयआयटी कानपूरचा विद्यार्थी असलेल्या आदित्यला इंजिनीअरिंगनंतर एका अमेरिकन कॉर्पोरेट पंपनीत वार्षिक 40 लाखांचे पॅकेज असलेली नोकरी मिळाली होती, पण डेस्क वर्कमध्ये अजिबात रस नसल्याने त्याचे या नोकरीत मन स्थिरावत नव्हते. कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी केव्हाही मिळू शकते. सामाजिकरीत्या देशाशी कनेक्ट होण्यासाठी आदित्यने या नोकरीवर पाणी सोडून यूपीएससी तयारी सुरू केली आणि तिसऱया प्रयत्नात देशात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. आदित्य याने 40 लाखांच्या पॅकेजची नोकरी ते यूपीएससीत टॉप केल्यापर्यंतची यशोगाथा एका मुलाखतीत सांगितली आहे.

मुलाखतीत 60 टक्के प्रश्न पोलीस सेवेवर आधारित होते. त्यानंतर आपली आवड लक्षात घेऊन प्रश्न विचारले जातातडायनासॉरमध्ये मला विशेष रस असल्यामुळे मुलाखतीत मला त्यावर आधारित प्रश्न मला विचारले.

 

स्थिरता यशाचा मंत्र!

स्थिरता हाच माझ्या यशाचा मंत्र आहे. हा खूप मोठा प्रवास आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये स्थिरता असणे आवश्यक आहे. तुम्ही आधी टार्गेट सेट करा. तिथपर्यंत जाण्यासाठी कष्ट घ्या. या प्रवासात तुमच्यामध्ये असणाऱया उणिवा भरून काढण्याकडे कल ठेवा, असा मंत्र या वेळी आदित्यने यूपीएससीची तयारी करणाऱया उमेदवारांना दिला. 

स्मार्टवर्कची गरज

यूपीएससीसारख्या परीक्षा व्रॅक करण्यासाठी हार्डवर्क नाही, तर स्मार्टवर्कची गरज असल्याचे आदित्य म्हणाला. यूपीएससीची तयारी करताना मी मागील दहा वर्षांच्या पेपर्सचे विश्लेषण केले, असे आदित्यने सांगितले.

अभ्यासासाठी दिनक्रम

हैदराबादमध्ये मी यूपीएससीची तयारी करतोय. अॅपॅडमीमध्ये पहाटे 5 वाजता ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतचे शेडय़ूल असते. त्यानंतर मी यूपीएससीची तयारी करायचो. संध्याकाळीच मला स्वअध्ययनासाठी वेळ मिळायचा. मी कुणालाही टिप्स देऊ इच्छित नाही. कोणी काय करावे, काय करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त प्रत्येकाने आपल्या ध्येयावर लक्ष पेंद्रित करणे आवश्यक असल्याचे तो म्हणाला.