चांद्रयान-3 चा तिसऱ्या कक्षेत प्रवेश

इस्रोच्या चांद्रयान – 3 ने चंद्राच्या तीसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे. आता चांद्रयान 174 किमी x 1437 किमी च्या लहान वर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. चांद्रयान – 3 ठरलेल्या वेळेपेक्षा कमी वेळात आपल्या मोहिमेचा टप्पा गाठला आहे. इस्रो कडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

इस्रोने 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी चांद्रयानाची कक्षा बदलली. म्हणजे थ्रस्टर्स सुरू झाले. चांद्रयान – 3 ने तब्बल 22 दिवसांनंतर म्हणजे 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यानंतर त्याने चंद्राची पहिली छायाचित्रे प्रसिद्ध केली होती.