अग्निशमन दलात आणखी दोन यंत्रमानव 

मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात लवकरच आणखी दोन यंत्रमानव (फायर रोबो) दाखल होणार आहेत. अत्यंत धोकादायक ठिकाणची आग नियंत्रणात आणताना या यंत्रमानवांचा वापर केला जाणार आहे. ‘रिमोट पंट्रोल’च्या सहाय्याने त्यांना ऑपरेट करता येणार आहे. महापालिका या दोन यंत्रमानवांसाठी साडेसात कोटी खर्च करणार आहे. त्यामुळे दलात यंत्रमानवांची संख्या चार होणार आहे. मुंबईत दरवर्षी सुमारे 5 हजार आगीच्या घटना घडतात. काही आगी या तळघराला लागतात तर काही वेळा अतिशय उंच अशा ठिकाणी अशा घटना घडतात. केमिकल कारखाने तसेच अत्यंत संवेदनशील अशा ठिकाणी यंत्रमानवांचा वापर करण्यात येणार आहे.