चंद्रपूरवर शिवकृपा, श्रावणात सापडले दोन प्राचीन शिवलिंग

श्रावण मासाचे धार्मिक महत्त्व फार मोठे आहे. भगवान शंकरांना अतिशय प्रिय असलेला हा महिना. शिवभक्त हा संपूर्ण महिना शिवभक्तीत घालवतात. श्रावण मासातील आजच्या पौर्णिमेलाच चंद्रपूरातून शिवभक्तांना सुखाविणारी घटना घडली. जिल्हातील चिमूर तालुक्यात येणाऱ्या नेरी येथे पार्वती मंदिर परिसरात खोदकामा दरम्यान दोन प्राचीन शिवलिंग सापडलीत. हे शिवलिंग मराठाकालीन असल्याचे इतिहास अभ्यासक अशोक सिह ठाकूर यांनी सांगितलं. एन श्रावण मासात शिवदर्शन झाल्याने भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे.

चिमूर तालुक्यातील नेरी येथे हेमाळपंथी मंदिर आहे. राक्षस मंदिर म्हणुनही हे मंदिर प्रसिद्ध आहे.या मंदिर परीसरात असलेल्या पार्वती मंदिरा समोर सभा मंडपासाठी खोदकाम करण्यात आले.मात्र पुरातत्व विभागाने काम थांबवण्याची नोटीस दिली. त्यामुळे काम थांबवण्यात आले. खोदकाम केलेले खड्डे आज ( बुधवार ) बुजविण्याचा कामाला सुरुवात करण्यात आली. खड्डे बुजवित असताना आजूबाजूची माती ओढताना दोन प्राचीन शिवलिंग सापडलेत. यातील एक शिवलिंग काळ्या दगडात कोरलेला आहे. तर दुसरा पांढऱ्या दगडातील आहे. हे दोन्ही शिवलिंग मराठा काळातील आहेत.शंकर देवाकडे एखादे नवस बोललं. ते नवस पूर्ण झालं कि श्रद्धेने मंदिर परिसरात भाविक शिवलिंग ठेवत असायचे. तशी प्रथा होती.एखाद्या भक्ताने ठेवलेले हे शिवलिंग असावे, असे अशोक सिहं ठाकूर यांनी सांगितले.