यूपीएससीच्या वर्ष 2025 साठीच्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) वर्ष 2025 साठीच्या सीएसई, एनडीए, एनए, सीडीएस, ईएसई, आयएफसी, आयईएस, आयएसएस, जिओ सायंटिस्ट आणि इतर परीक्षांसाठी नोंदणी व परीक्षेची तारीख जाहीर केली. अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षा (ईएसई प्रिलिम्स) 2025 साठी नोंदणी 18 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2024 या कालावधीत होईल. यानंतर 9 फेब्रुवारी 2025 रोजी ही परीक्षा होणार आहे. तसेच संयुक्त भू-शास्त्रज्ञ (प्राथमिक) परीक्षादेखील 9 फेब्रुवारी 2025 लाच होणार आहे. नागरी सेवा परीक्षा 2025 आणि भारतीय वनसेवा परीक्षा 2025 म्हणजेच यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठी (सीएसई) नोंदणी प्रक्रिया 22 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा 25 मे रोजी पार पडेल. या प्रिलिम्समध्ये यशस्वी होणाऱया उमेदवारांसाठी नागरी सेवा मुख्य परीक्षा 22 ऑगस्ट 2025 पासून आयोजित केली जाईल.