World Cup 2023 : हिंदुस्थान विरुद्ध न्यूझीलंड, 2019 चा बदला पूर्ण होणार?

एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या पर्वातील उंपात्य फेरीतील पहिली लढत आज (बुधवार, 15 नोव्हेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. अपराजित हिंदुस्थान विरुद्ध संयमी न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगेल.

विश्वचषक 2023 (World Cup 2023) चा सर्वात यशस्वी संघ कोणता असं कोणी विचारलं, तर सर्वांच्या तोंडी एकच नाव येईल ते म्हणजे हिंदुस्थान. प्रेक्षकांचा पाठिंबा आणि खेळाडूंच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे हिंदूस्थान या विश्वचषकात सलग 9 सामने जिंकत अपराजित राहिला. पण उंपात्य फेरीची लढत अटीतटीची असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हिंदुस्थानला उंपात्य फेरीत न्यूझीलंड विरुध्द विश्वचषकातील सर्वोत्तन प्रदर्शन करावे लागणार आहे.

2019 चा बदला पूर्ण होणार?

शांत, संयमी आणि तितकाच घातक असणारा न्यूझीलंडचा संघ हिंदुस्थानसाठी नेहमीच आव्हनात्मक ठरला आहे. 2019 च्या विश्वचषकाची उंपात्य फेरी असो अथवा 2021 ची आयसीसी (ICC) जागतिक कसोटी चॅम्पियमशिप ट्रॉफीची अंतिम लढत असो, हिंदुस्थानला न्यूझीलंडने धुळ चारली आहे. पण 2023 च्या विश्वचषकात हिंदुस्थानचा संघ चित्त्याच्या वेगाने सर्व संघांना पराभूत करत उंपात्य फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे विश्वचषक 2023 चा प्रमुख दावेदार हिंदुस्थान असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर 2011 मध्ये महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वात हिंदुस्थाननं 28 वर्षांनी विश्वचषक जिंकला होता. सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, युवराज, गंभीर यांची फटकेबाजी आणि झहीर खान, मुनाफ पटेल आणि हरभजन सिंग यांच्या घातक गोलंदाजीने सर्वांची मन जिंकली आणि कुमार संगकाराच्या श्रीलंकेला नमवत हिंदुस्थानने ही किमया साधली होती.

2019 च्या विश्वचषकात हि संधी पुन्हा चालून आली होती. पण मँचेस्टर मध्ये रंगलेल्या उंपात्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने हिंदुस्थानच्या स्वप्नांवर पाणी फेरलं. 2023 मध्ये पुन्हा एकदा हिंदुस्थान विरुद्ध न्यूझीलंड हे दोन संघ उंपात्य फेरीत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. हिंदुस्थानची विश्वचषकातील कामगिरी पाहता 2019 चा बदला पुर्ण होईल अशी आशा हिंदुस्थानातील क्रिडाप्रेमींना आहे.

हिंदुस्थानच्या फलंदाजीची पावरफुल कामगिरी

कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के एल राहूल यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करताना 300 ते 400 धावसंख्या उभारण्यात हिंदुस्थान यशस्वी ठरला आहे. सलामीला येणाऱ्या रोहित शर्मा आणि शूभमन गिल यांनी हिंदुस्थानला आतापर्यंत चांगली सुरुवात करुन दिली आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 503 धावा बनवल्या आहेत. तर, शुभमन गिलने 7 सामन्यांमध्ये 270 धावा केल्या आहेत.

एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिन तेंडूलकर यांच्या सर्वाधीक 49 शतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरी करत विराट कोहलीने सर्वाधीक 593 धावांची आतिषबाजी केली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या पराभवात विराट कोहलीच्या 50 व्या शतकाचा समावेश असावा अशी सर्वच चाहत्यांची अपेक्षा असणार आहे.

2015 आणि 2019 च्या विश्वचषकात उंपात्य फेरीत विराट कोहली केवळ एका धावसंख्येवर बाद झाला होता. त्यामुळे विराट कोहलीच्या खेळीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. तसेच मधल्या फळीत श्रेयस अय्यर आणि के एल राहूल यांच्यावर सुध्दा जबाबदारी असणार आहे.

हिंदुस्थानची घातक गोलंदाजी

जसप्रीत बुमरा (17 विकेट), मोहम्मद सिराज (12 विकेट) आणि मोहम्मद शामी 5 सामन्यांमध्ये (16 विकेट) या तिघांच्या भेदक माऱ्यापुढे विरोधी फळीतील फलंदाजांचा निभाव लागला नाही. या तिघांना सात मिळाली ती कुलदीप यादव (14 विकेट) आणि रविंद्र जडेजाच्या (16 विकेट) चतूर फिरकीची. त्यामुळे उपांत्य फेरीत गोलंदाजांचा आक्रमक पवित्रा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सूक असणार आहेत.

फलंदाजी आणि गोलंदजी मध्ये न्यूझीलंडचा संघाने सुध्दा चांगली कामगिरी केली आहे. हिंदुस्थानी वंशाच्या रचिन रवींद्रने 565 धावा करत अवघ्या क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची धकल घ्यायाला भाग पाडलं. तसेच डेवोन कॉन्वे, केन विलियमसन आणि डेरेन मिचेल यांची कामिगीर सुध्दा चांगली राहिली आहे. तर गोलंदाजी मध्ये ट्रेंट बोल्ट, मिशेल सेंटनर आणि लॉकी फर्ग्यूसन यांच्यावर विशेष नजरा असणार आहेत.