यवतमाळ @45… तरीही रखरखत्या उन्हातही यवतमाळचे ट्राफिक पोलीस ऍक्शन मोड मध्ये!

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ यवतमाळमध्ये सूर्य अक्षरश: आग ओकतोय. असं असाल तरी रखरखत्या उन्हातही यवतमाळचे ट्रॅफिक पोलीस उन्हाची पर्वा न करिता अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. पुण्यातील अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाल्या प्रकरणी राज्यातील वाहतूक पोलिसांना अल्पवयीन मुलांना वाहन चालविताना परवाना नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबाबतचे आदेश प्राप्त झाल्याने यवतमाळतील वाहतूक शाखेने बसस्थानक चौकात स्पेशल ड्राईव्ह घेऊन कारवाई करण्यात आली .

यवतमाळ शहरांमध्ये 14 वयोगटापासून तर 18 वयोगटापर्यंत अनेक बालक बेधुंद होऊन वाहने पळवितात मोटरसायकल, बुलेट,जुपिटर, याशिवाय अन्य वाहने अतिशय वेगात जोरात हॉर्न वाजवीत पळवीतात अनेकदा त्यांच्या या वेगवान वाहनामुळे अपघात देखील होत आहे पण लहान बालक असल्याने यांच्या विरोधात तक्रार करणार कोण? यामुळे त्यांना सोडल्या जाते मात्र असाच प्रसंग पुण्यात झाला आणि दोघांचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला .

आता त्याच धर्तीवर असा प्रसंग यवतमाळ निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने शहरात वेगवेगळ्या चौकामध्ये स्पेशल ड्राईव्ह घेण्यात आले आहे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून हा ड्राईव्ह घेतल्याचे सांगितले यात अनेक दुचाकींचे दुचाकींवर चलान फाडण्यात आले. एकूणच दंडात्मक कारवाई झाल्यानंतर ती वाहन सोडून देण्यात येणार आहे आज ज्या बालकांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता अनेकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे दिसून आले. हा ड्राईव्ह आता अनेक दिवस पर्यंत सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक अजित राठोड यांनी दिली आहे

नियमांतर्गत राहून वाहन चालविणे हा कायदा असताना देखील या कायद्याची पायमल्ली सातत्याने होत असते मात्र त्याला आळा घालणार कोण हा विषय नेहमीच पुढे येतो एखादी घटना घडली की त्या घटनेकडे लक्ष ठेवून मग मात्र आपल्या पोलीस खात्याला जाग येते .अनेक दिवस पर्यंत झोपलेले हे पोलीस खाते पटकन जागे होऊन कारवाईच्या मागे लागतात असाच हा प्रकार होऊ नये आणि पोलिसांनी कारवाईमध्ये सातत्य ठेवावे अशी अपेक्षा सामान्य नागरिक करीत आहे .