वंचितचा उमेदवारी अर्ज रद्द; वाचा काय आहे कारण

abhijit-rathod

>> प्रसाद नायगावकर, यवतमाळ

यवतमाळमध्ये वंचितने ऐनवेळी उमेदवार बदलून नव्या चेहऱ्याला संधी दिली होती. पण आता त्याच उमेदवाराचा रद्द झाला आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अनेक मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. यात यवतमाळमध्ये वंचितने ऐनवेळी उमेदवार बदलून नव्या चेहऱ्याला संधी दिली. पण आता त्याच उमेदवाराचा अर्ज रद्द झाला आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितनं अभिजित राठोड यांना उमेदवारी दिली होती. पण अर्जात त्रुटी असल्यानं त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला सुभाष खेमसिंग पवार यांना उमेदवारी दिली होती. यानंतर सुभाष पवार यांनी प्रचारालाही सुरुवात केली. पण ऐनवेळी सुभाष पवार यांना माघार घ्यायला लावून अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. मात्र आता अभिजित राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्यानं तो रद्द झाला आहे.

यासंदर्भात वंचित आता वंचितला न्यायालयाकडे दाद मागावी लागेल. न्यायालयाचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही तर वंचित नेमकं कोणाला पाठिंबा देते हे ही पाहणे महत्वाचं आहे. आता नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.