धोनीमुळेच 2019 चा उपांत्य सामना हरलो

2019 च्या वर्ल्ड कपचा उपांत्य सामना हिंदुस्थान महेंद्रसिंह धोनीमुळे हरला आहे. दुसर्या कोणत्याही कर्णधाराने वर्ल्ड कप जिंकू नये याच भावनेमुळे धोनी मुद्दाम बाद झाल्याचा खळबळजनक आरोप खुद्द युवराज सिंहचे वडिल योगराज सिंह यांनी केला. महेंद्र सिंह धोनी हा हिंदुस्थानचा एकमेव कर्णधार आहे, जो आयसीसीच्या तीन ट्रॉफीज जिंकला आहे. मात्र त्याच्यानंतर विराट कोहलीला 2019 चा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी होती, पण धोनीमुळे हिंदुस्थानचे जेतेपदाचे स्वप्न भंग झाले. हिंदुस्थानचे जेतेपदाचा खरा दावेदार होता आणि पण हिंदुस्थान उपांत्य सामना हरावा म्हणून धोनीने खराब फलंदाजी केली. जडेजा चांगला खेळत होता आणि तो संघाला लक्ष्यासमीप आणण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र दुसरीकडे धोनी मुद्दाम संथ खेळत संघाला लक्ष्यापासून दूर नेत होता. धोनी ज्या खेळासाठी प्रसिद्ध आहे, तसा तो खेळत नव्हता. धोनीने आपल्या क्षमतेच्या 40 टक्केही फलंदाजी केली असती तर हिंदुस्थान 48 व्या षटकातच जिंकला असता, असेही योगराज आपल्या एका मुलाखतीत म्हणाले.