कर्नाटकात नदीत सापडली राम लल्लासारखीच प्राचीन विष्णू मूर्ती

कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील कृष्णा नदीतून एक प्राचीन विष्णू मूर्ती आणि शिवलिंग सापडले आहे.

रायचूरमधील देवसुगुर गावाजवळ नदीवर पूल बांधण्याच्या कामादरम्यान हिंदू देवतांच्या शतकानुशतके जुन्या मूर्ती सापडल्या.

कर्मचाऱ्यांनी नदीतून मूर्ती सुरक्षितपणे बाहेर काढल्या आणि तातडीने स्थानिक प्रशासनाला माहिती दिली.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सापडलेल्या मूर्तींमध्ये भगवान कृष्णाच्या दशावतार आणि शिवलिंगाचा समावेश आहे. काहींनी अयोध्येतील राममंदिरात नुकत्याच साकारलेल्या रामलल्लाच्या मूर्तीशी सापडलेल्या मूर्तींचे साम्यही दाखवले.

‘ही मूर्ती असंख्य वैशिष्ट्यांना दर्शवते. त्याच्या सभोवतालच्या तेजस्वी आभासह पीठावर तयार केलेल्या या शिल्पामध्ये मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांच्यासह भगवान विष्णूच्या दहा अवतार पाहायला मिळतात’, अशी माहिती प्राचीन इतिहास आणि पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासक डॉ. पद्मजा देसाई यांनी दिली.