भाजप नेत्याला आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार, केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजप नेते दिलीप घोष यांना नोटीस बजावली आहे. तृणमूल काँग्रेसने दिलीप घोष यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर घोष यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

या नोटिसीनुसार घोष यांनी गुरुवार 28 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उत्तर द्यावे असे आदेश देण्यात आले आहेत. पश्चिम बंगालचे भाजप नेते दिलीप घोष यांनी तृणमूलच्या निवडणूक घोषणेची खिल्ली उडवल्याचा आरोप तृणमूलने केला होता. ममता बॅनर्जींवर याच मुद्द्यावरून घोष यांनी आक्षेपार्ह टीका केली होती. त्याविरोधात तृणमूलने आयोगाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊनच घोष यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

घोष यांच्याखेरीज काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनाही आयोगाने नोटीस दिली आहे. अभिनेत्री कंगना राणौत हिच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे आयोगाने श्रीनेत यांना नोटीस बजावली आहे. तर, आपलं एक्स अकाउंट हॅक झाल्याचं म्हटलं आहे.