हॅकर्सचे टेन्शन नको? एक्रीप्शन आणि बॅकअपची सवय लावून घ्या

कॉम्प्युटरच्या जमान्यात अनेक नवनवीन सॉफ्टवेअर येत असून तंत्रज्ञानात वेगाने बदल होत आहेत. परंतु कॉम्प्युटर जसे वरदान आहे तसे शापही बनू शकते. हॅकर्स तुमचा महत्त्वाचा डेटा चोरू शकतात किंवा एखादी महत्त्वाची फाईल, डेटा तुमच्याकडून डिलीटही होऊ शकते. अशावेळी एक्रीप्शन आणि बॅकअप कामाला येते. त्यामुळे याची सवय लावून घेणे हा एकच पर्याय हॅकर्सपासून वाचण्यासाठी आहे. ऑनलाइन माध्यमातून आर्थिक फसवणुकीच्या घटनाही घडलेल्या आहेत. अनेकांची बँक खाती रिकामी झाली आहेत. त्यामुळे हॅकिंग टाळण्यासाठी भविष्यात उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

 

  या गोष्टी डोक्यात फीट करा

– विविध ऑनलाईन डेटा बॅकअप टूल्स उपलब्ध आहेत. या टूल्सच्या मदतीने डेटा बॅकअपची सुरक्षा निश्चित करून घेता येते. मात्र शेकडो डेटा
बॅकअप उपलब्ध असतात. अशावेळी कोणता टूल तुमच्यासाठी उत्तम ठरेल हे ठरविणे मुश्कील बनते, अशावेळी तज्ञांचा सल्ला घेता येतो

डेटा बॅकअप ठेवला तर लॉस झालेला किंवा उडालेला डेटा काही प्रमाणात पुन्हा मिळवता येतो. त्यामुळे रिकव्हरी
ऑप्शनदेखील पडताळून पाहायला हवेत.

डेटाचे नियमित बॅकअप घ्या

आपल्या डेटाचा नियमित बॅकअप घेत रहा. हार्ड ड्राईव्ह तसेच व्हर्च्युअल स्टोरेज म्हणजेच क्लाऊड सर्व्हरवर डेटाचा बॅकअप घेता येईल.

 

डेटाचे एक्रीप्शन घ्या

आर्थिक डेटा किंवा महत्त्वाच्या फाईल्सची हार्ड कॉपीदेखील ठेवणे महत्त्वाचे आहे. याशिवाय लोकल सर्व्हरवर जितका डेटा आहे तो
डेटा एक्रीप्ट करावा, जेणेकरून संवेदनशील डेटा जरी लीक झाला तरी त्यापासून कोणतेही नुकसान होणार नाही